Grahan सूर्यग्रहण पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी, पुण्यात दिसले 23 टक्क्यांहून अधिक सूर्यग्रहण - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
🎬 Watch Now: Feature Video
Grahan पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ Savitribai Phule Pune University आणि आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्र यांच्यातर्फे खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यापीठाचे क्रीडांगण येथे ग्रहण पाहण्यासाठी दुर्बीण, कॅमेरा आणि खास आवरण असलेले चष्म्यांद्वारे सर्वसामान्य पुणेकरांना ग्रहण पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये येतो आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते त्याला सूर्यग्रहण म्हटले जाते. त्यातही सूर्याचा काहीच भाग चंद्राकडून झाकला जातो, तेव्हा ते खंडग्रास सूर्यग्रहण असते. ग्रहण ही दुर्मीळ घटना मानली जाते. त्यामुळे त्याचे वैज्ञानिक महत्त्व असते. 4 वाजून 51 मिनिटांनी सुरू होणारी ग्रहण स्थिती सायंकाळी 6 वाजून 5 मिनिटांपर्यंत असणार आहे. विद्यापीठ आणि आयुक्त यांच्यातर्फे विद्यापीठाच्या क्रीडांगणावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ग्रहण काळात सूर्याकडे उघड्या डोळ्यांना पाहणे धोक्याचे असल्याने दुर्बीण, कॅमेरा आणि खास आवरण असलेले चष्मे उपलब्ध करून दिली आहे. पुणेकर नागरिकांनी हे ग्रहण पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST