श्रावणाची चाहूल; मटण-चिकन खरेदीसाठी पुणेकरांची तोबा गर्दी, लांबच लांब रांगा - पुणेकरांची गर्दी
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - आषाढ महिन्यातील शेवटच्य रविवारी एकदशी असल्याने आज पुणेकरांनी मटन घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. सकाळी 5 वाजल्यापासून मटणाच्या दुकानाबाहेर रांगा लागलेल्या आहेत. आषाढ महिन्यामधील शेवटचा दिवस म्हणजे आषाढी अमावस्या याला गटारी अमावस्या म्हणूनही ओळखले जाते. या दिवसासाठी मांसाहारी लोक आधीपासून कार्यक्रमाचे नियोजन करतात. अनेक लोक मांस, मद्य व इतर पदार्थांचे सेवन श्रावण महिन्यात करत नाहीत. त्यामुळे श्रावण सुरू होण्यापूर्वीच या गोष्टींवर मनसोक्त ताव मारून घेतात. अनेक खवय्यांनी रविवारी हा दिवस साजरा करण्याचा बेत अखलेला असतो. गेल्या 8 दिवस पुण्यामध्ये जोरदार पाऊस असल्याने पुणेकर घराबाहेर पडले नव्हते. कालपासून पावसाची उघडीत झाल्याने पुणेकर आज मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले आहे. आज पहाटेपासूनच मटन खरेदी करण्यासाठी लांबच- लांब रांगा लागल्या आहेत. 2- 3 तास रांगेत उभा राहून पुणेकर मटण खरेदी करत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST