Cricket World Cup २०२३ : भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय; पुण्यात जल्लोष

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 14, 2023, 11:01 PM IST

thumbnail

पुणे Cricket World Cup २०२३ : विश्वचषकात खेळल्या गेलेल्या आजच्या सामन्यात भारतानं पाकिस्तानवर ७ गडी राखून विजय मिळवला. भारताकडून कर्णधार रोहित शर्मानं धुवांधार फलंदाजी करत ६३ चेंडूत ८६ धावा ठोकल्या. (India victory over Pakistan) भारताच्या या विजयानंतर पुण्यात ठिकठिकाणी नागरिकांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. (India Pakistan Cricket Match) पुण्यातील गुडलक चौकात तर नागरिकांनी मोठी गर्दी करत जल्लोष साजरा करण्यात येत आहे. भारत माता की जय, इंडिया इंडिया अशी घोषणाबाजी करत तरुणांनी जल्लोष साजरा केला आहे.

भारतानं निम्मी लढाई आधीच जिंकली: या विजयासह भारतानं पाकिस्तानवरच्या निर्विवाद वर्चस्वाची आपली परंपरा कायम राखली. अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवरच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी आज पाकिस्तानची अवघ्या १९१ धावांत दाणादाण उडवली आणि तिथंच भारतानं निम्मी लढाई जिंकली. मग रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरनं तिसऱ्या विकेटसाठी रचलेल्या ७७ धावांच्या भागिदारीनं भारताला विजयपथावर नेलं. रोहित शर्मानं ६३ चेंडूंत सहा चौकार आणि सहा षटकारांसह ८६ धावांची मॅचविनिंग खेळी उभारली. श्रेयस अय्यरनं ६२ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद ५३ धावांची खेळी रचली. त्याआधी पाकिस्तानच्या डावात जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव आणि रवींद्र जाडेजानं प्रत्येकी दोन विकेट्स भारतीय विजयात मोलाचं योगदान दिलं.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.