अंतिम सामन्यात भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी 'क्रिकेटचा देव' अहमदाबादेत, काय म्हणाला सचिन? - india vs australia world cup 2023

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 19, 2023, 10:10 AM IST

अहमदाबाद  india vs australia world cup 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर विश्वचषकातील अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना बघण्यासाठी सर्वच क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थित राहणार आहे. यात विश्वचषक विजेते माजी कर्णधार, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक मान्यवर मैदानावर उपस्थित राहणार आहेत. हा सामना बघण्यासाठी माजी भारतीय क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर हा अहमदाबादला पोहोचलाय. यावेळी माध्यमांशी बोलताना सचिननं अंतिम सामन्याबाबत प्रतिक्रिया दिलीय. सचिन म्हणाला, 'मी संघाला शुभेच्छा देण्यासाठी इथं आलो आहे. आम्ही आज विश्वचषक उचलू अशी अपेक्षा आहे. प्रत्येकजण या दिवसाची वाट पाहत आहे, असंही सचिन म्हणाला. सर्व देशभरात अंतिम सामन्याची उत्सूकता शिगेला पोहोचलीय. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.