Nashik News: ट्रकमधून बकऱ्या फेकण्याच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी 'त्या' अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल - ट्रकमधून बकऱ्या फेकण्याच्या व्हायरल व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक : समाज माध्यमावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये एका चालत्या ट्रकमधून बकऱ्या फेकण्याचा निर्दयी प्रकार समोर येत आहे. हा व्हिडिओ आधी उत्तर प्रदेशमध्ये असल्याचा दावा करण्यात येत होता. परंतु उन्नाव पोलिसांनी हा व्हिडिओ महाराष्ट्रातील इगतपुरी तालुक्यातील असल्याचे ट्वीट केले. त्यानंतर ईटीव्ही भारतने या व्हिडिओची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला असता हा व्हिडिओ नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील खंबाळे फाटा परिसरातील आहे, असे दाव्याची पडताळणी केली असता त्यातून समोर येत आहे. घोटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. या संदर्भात त्या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. 1 मे 2023 रोजी ही घटना रात्री 7 ते सकाळी 6 वाजेदरम्यान घडल्याचे समोर आले आहे. या व्हिडीओमध्ये कुणीतरी अनोळखी व्यक्ती चालत्या ट्रकमधून बकऱ्या बाहेर फेकल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करण्यात आला होता. त्यानंतर तो व्हॉट्सअपवर व्हायरल करण्यात आला होता.