आरे कारशेड विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष आक्रमक; मुंबईत कार्यकर्त्यांचे आंदोलन - भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मेट्रो तीनच्या आरे कारशेड विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) आक्रमक झाला असून आज रविवार (दि. 25 सप्टेंबर) रोजी आरे जंगलातील पिकनिक पॉईंट येथे कारशेड विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी भाकप (कम्युनिस्ट)चे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आंदोलकांकडून आरे कारशेड विरोधात व शिंदे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आल्याचेही पाहायला मिळाले. राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर मेट्रो तीन साठीचे कांजूरमार्ग येथील कारशेड रद्द करून ते पुन्हा अरे येथे करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या निर्णयाला पर्यावरण प्रेमी संघटनासोबतच शिंदे गट व भाजप सोडून इतर सर्वच राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. सत्तांतर झाल्यापासून प्रत्येक रविवारी आरे येथे पर्यावरण प्रेमींसोबतच विविध राजकीय पक्ष आंदोलन करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST