ST Bus Accident : इंदोरवरून अंमळनेरकडे येणाऱ्या एसटी बस दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू - accident happened between Khalghat and Thigri
🎬 Watch Now: Feature Video
भोपाळ - इंदूरहून जळगाव जिल्ह्यातील अंमळनेरकडे निघालेली बस नर्मदा नदीत कोसळून ( Bus fell into Narmada river ) 13 प्रवाशांचा मृत्यू ( 13 passengers Killed ) झाल्याची घटना घडली आहे. मध्यप्रदेशातील धार येथे ( accident happened between Khalghat and Thigri ) ही घटना घडली. या बसमध्ये 40 प्रवासी होते. नदीच्या पुलावरील कठडा तोडून ही बस नदीपात्रात कोसळली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी चर्चा करून घटनेची माहिती घेतली. इंदोरहून ही बस सकाळी साडेसात वाजता निगाली होती. खलघाट अणि ठीगरीमध्ये नर्मदा पुलावर येताच या बसचा अपघात झाला. चंद्रकांत एकनाथ पाटील (चालक), प्रकाश श्रावण चौधरी (वाहक) हे दोघेही या अपघातात मृत्युमुखी पडले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर ( Announced of Rs 10 lakh Each to Relatives ) केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST