कोकणासाठी जेवढं काही करता येईल तेवढं करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Coca Cola Company
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 30, 2023, 6:46 PM IST
रत्नागिरी CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकण दौऱ्यावर आहेत. रत्नागिरीत शीतपेय बनवणारी कंपनी 'कोका-कोला' (Coca Cola Company) 2,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. रत्नागिरीतील कोका-कोला कंपनीच्या प्रकल्पाच्या 700 कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्याचं गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या प्रकल्पाच्या माध्यमातून कोकणात दोन ते तीन हजार लोकांना रोजगार मिळणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच उद्घाटनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, कोकणात उद्योग आले पाहिजेत त्याची सुरुवात झालेली आहे. कोकणासाठी जेवढं काही करता येईल तेवढं करणार. कोकणचा विकास झाला तर इथल्या तरुणांना कामासाठी कुटुंब सोडून मुंबई-ठाण्यात जावं लागणार नाही. त्यामुळं आम्ही कोकणच्या विकासाला प्राधान्य देत आहोत.