सातारा परिसरात ढगफुटी सदृश पाऊस; घरांमध्ये पाणी शिरले, शेती जलमय - परतीच्या पावसाने झोडपून काढले
🎬 Watch Now: Feature Video
सातारा - सातारा शहरासह आजूबाजूच्या परिसराला परतीच्या पावसाने झोडपून काढले. ढगफुटी सदृश्य पावसामुळे लिंब, गोवे परिसरातील ओढ्यावरील पूल पाण्याखाली गेले आहेत. काही भागातील घरांमध्ये देखील पावसाचे पाणी शिरले आहे. शेती जलमय झाली आहे. मुसळधार पावसामुळे सातारा परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आवळीमाथा, कासाईमळा तसेच चतुरबेट येथील पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक बंद झाली आहे. दि. ११ सप्टेंबरपर्यंत सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडतेवेळी झाडाखाली थांबू नये, ओढे, नाले, नदीच्या पुलावरून पाणी वाहत असताना पूल ओलांडू नये, अतिवृष्टी कालावधीत घराबाहेर पडण्याचे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST