Rain Update : संजरपूरवाडी, करजंगाव येथे ढगफुटी सदृश पाऊस; कोवळ्या पिकांना बसणार फटका - Cloud burst like heavy rain
🎬 Watch Now: Feature Video
छत्रपती संभाजीनगर (वैजापूर) : मोठ्या विश्रांतीनंतर वैजापूर तालुक्यात पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तालुक्यातील संजरपूरवाडी, करजंगाव येथे ढगफुटी सदृश पाऊस पडला आहे. त्यामुळे जमिनीतील पीकासह माती देखील वाहून गेल्याने शेतकरयाचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी जून महिन्यात वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यावर वरून राजाने अवकृपा दाखवली आहे. पेरणी झाल्याच्या सुरुवातीपासून म्हणजे एक महिन्यापासून तालुक्यात केवळ रिमझिम पाऊस बघायला मिळाला होता. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी तालुक्यातील अनेक भागात मोठ्या पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे कोवळ्या पिकांना मोठा फटका बसणार आहे. दरम्यान, संजरपुरवाडी, करजंगाव येथे तब्बल एक तास ढगफुटी सदृश पाऊस कोसळला. त्यामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी झाल्याचे चित्र बघायला मिळाले. अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. काही ठिकाणी पिके सुद्धा पूर्ण पणे पाण्याखाली गेले आहेत.