रुळावरुन प्लॅटफॉर्मवर चढलं रेल्वेचं इंजिन; वेग कमी असल्यानं टळला मोठा अपघात - बिलासपूर रेल्वे स्थानक
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 17, 2024, 12:24 PM IST
बिलासपूर (छत्तीसगड) Chhattisgarh Express : बिलासपूर रेल्वे स्थानकावर मंगळवारी सायंकाळी मोठा अपघात झालाय. रेल्वेचं इंजिन अचानक प्लॅटफॉर्मवर चढलं. त्यामुळं स्थानकात एकच धावपळ उडाल्याचं पाहायला मिळालं. हा अपघात झाला तेव्हा प्लॅटफॉर्मवर अनेक प्रवासी रेल्वेची वाट पाहत उभे होते. मात्र सुदैवानं मोठा अपघात टळाला. बिलासपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म 8 वर रात्री 9:30 वाजता हा अपघात झाला. छत्तीसगड एक्स्प्रेसचं इंजिन प्लॅटफॉर्मच्या शेवटच्या टोकाला असलेल्या स्टॉपरला धडकलं. त्यामुळं भिंत पूर्णपणे तुटली. तसंच फलाटावरील अनेक फरशाही उखडल्या आहेत. शूटिंग करताना हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतंय. सुदैवानं ट्रेनचा वेग कमी असल्यानं आणि ट्रेनमध्ये प्रवासी नसल्यानं जीवितहानी झाली नाही. अन्यथा मोठी जीविहानी झाली असती. सध्या रेल्वेच्या संबंधित विभागानं या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सध्या थंडी आणि धुक्यामुळं अनेक गाड्या उशिरानं धावत आहेत. त्यामुळं प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक तास प्रवासी रेल्वे स्ठानकावर गाडीची वाट पाहत आहेत.