Sambhaji Maharaj Jayanti 2023 : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी - छत्रपती संभाजी महाराज जयंती छत्रपती संभाजीनगर
🎬 Watch Now: Feature Video
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत आज (रविवारी) शहरात छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राजनाथ सिंह यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा जयघोष केला. महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून चौकाचौकात भगव्या पताका व तोरण बांधण्यात आले होते. तर शिवप्रेमींकडून इमारतींवर आकर्षक रोशनाई केली गेली होती.
मान्यवरांकडून संभाजीराजांना पुष्पहार अर्पण: केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजी नगर शहरातील टीव्ही सेंटरमध्ये असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींनी लाखोच्या संख्येने गर्दी केली होती.
हेही वाचा: