महात्मा फुलेंना अभिवादनासाठी फुले वाड्यात गर्दी; भुजबळांच्या भाषणाकडं सर्वांचं लक्ष - Chhagan Bhujbal VS Manoj Jarange Patil
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 28, 2023, 1:30 PM IST
पुणे Pune Phule Wada : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज (28 नोव्हेंबर) पुण्यातील फुलेवाडा येथे सकाळपासूनच मोठी गर्दी झाल्याचं बघायला मिळंतय. दरम्यान, महात्मा फुलेंच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी समता पुरस्कार देण्यात येतो. आज या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी राज्य सरकारमधील मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ हे देखील उपस्थित राहणार आहेत. तसंच यावेळी ते भाषणही करणार आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ आमने-सामने आले आहेत. त्यामुळं आज भाषणातून छगन भुजबळ काही संदेश देतात का? याकडं सर्वांचंच लक्ष लागलंय. तसंच आज फुलेवाडा येथे अभिवादन करण्यासाठी आलेल्या नागरिकांनी सुद्धा 'मी ओबीसी', 'मी भुजबळ' अशा टोप्या घातल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, आज छगन भुजबळांविरोधात मराठा समाज आक्रमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्यामुळं फुलेवाडा परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आलाय.