ETV Bharat / state

काँग्रेस गद्दार तर भाजपा महा गद्दार - महादेव जानकर - MAHADEV JANKAR AND BACCHU KADU

मेंढपाळांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात बच्चू कडू आणि महादेव जानकर यांच्या नेतृत्वात मेंढपाळांचा मोर्चा अमरावती विभागीय कार्यालयावर धडकला. मागण्या मान्य झाल्या नाही तर मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला.

जानकर आणि बच्चू कडू मोर्चाला संबोधित करताना
जानकर आणि बच्चू कडू मोर्चाला संबोधित करताना (Etv Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 23 hours ago

Updated : 23 hours ago

अमरावती - राज्यातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ केल्याची घोषणा या सरकारनं केली. आता घोषणा केली असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गायब झालेत. शेतकऱ्यांनी कर्ज 31 मार्चच्या आत भरलं नाही तर त्यांना सहा टक्के व्याजमाफी मिळणार नाही. सहा टक्के व्याजमाफी मिळाली नाही तर शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी कर्जच मिळणार नाही. हे वास्तव असताना आता आर्थिक परिस्थिती चांगली नाही असं कारण दिलं जात असून चार-पाच महिने तरी कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणार नाही असं सरकारकडून बोललं जातय. हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप प्रहार पक्षाचे प्रमुख आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी केला तर इथून पुढे मोठ्या पक्षांना मतदान करू नका असं आव्हान करत काँग्रेस गद्दार तर भाजपा महा गद्दार असल्याचा आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी केला. अमरावतीत मेंढपाळांच्या मोर्चाला या दोन्ही नेत्यांनी संबोधित करताना शासनावर टीकास्त्र सोडले.

विभागीय आयुक्तालयावर धडकला मोर्चा - राज्यातील मेंढपाळांना त्यांच्या जनावरांसाठी चराईक्षेत्र नाही. चारा मुबलक उपलब्ध असतानाही जनावरांना तो मिळू दिला जात नाही. वनविभागाचे कठोर कायदे मेंढपाळांना त्रासदायक असून मेंढपाळांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात मंगळवारी बच्चू कडू आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख तथा माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वात मेंढपाळांचा मोर्चा अमरावती विभागीय कार्यालयावर धडकला. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर विभागीय कार्यालय परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.

जानकर आणि बच्चू कडू मोर्चाला संबोधित करताना (ETV Bharat)

आपल्या चिन्हाचं बटन दाबण्यासाठी योजना - राज्यात जे खरे कष्टकरी आहेत, त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळायला हवा. मात्र असं काहीही न होता जे काहीच करत नाहीत अशांना केवळ आपल्या पक्षाचं बटन निवडणुकीत दाबावं यासाठी योजनांचा लाभ दिला जातो अशी टीका बच्चू कडू यांनी केली. जे खरे कष्टकरी आहेत केवळ तेच शासकीय योजनांचे लाभार्थी व्हावेत असं बच्चू कडू म्हणाले.

पुढचा मोर्चा पुण्यात - मेंढपाळांना न्याय मिळावा यासाठी आज काढलेला मोर्चा हा शासनाला इशारा आहे. हा इशारा शासनाला कळला नाही तर माझ्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल आहेत, माझी आई म्हणते हजार व्हायला हवेत याची जाणीव शासनाला असावी. आज अतिशय शांततेनं इशारा देण्याकरता हे आंदोलन असलं तरी भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला. आज अमरावतीत इशारा देण्यासाठी आंदोलन झालं असलं तरी पुढचं आंदोलन हे पुण्यात होईल असं महादेव जानकर म्हणाले.

हेही वाचा...

Last Updated : 23 hours ago
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.