thumbnail

By

Published : Jul 14, 2023, 12:51 PM IST

ETV Bharat / Videos

Chandrayaan 3 Launch : चांद्रयान ३ चे मोहिमेत सुरतच्या कंपनीने 'हे' दिले महत्त्वाचे योगदान

सुरत : चांद्रयान ३ च्या प्रक्षेपणासाठी अवघे काही तास उरले आहेत. वैज्ञानिक समुदाय चंद्र मोहिमेच्या यशाची आतुरतेने वाट पाहत आहे. सुरत स्थित कंपनीला भारताच्या ऐतिहासिक मिशनचा एक भाग असल्याचा अभिमान आहे. चांद्रयान 3 आणि इतर रॉकेटमध्ये वापरलेले सिरॅमिक्स सुरतच्या हिमसन सिरॅमिक्स या कंपनीने तयार केले आहेत. ही कंपनी गेली तीस वर्षे इस्रोसाठी सिरॅमिक्स बनवत आहे. हिमसन सिरॅमिक्सचे एमडी निमेश बचकानीवाला यांनी सांगितले की, हा स्क्विब एक सिरॅमिक घटक आहे. तो सिरॅमिक मटेरियलपासून बनलेला आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते जास्त तापमानात वितळत नाही. जेव्हा ते खूप उच्च तापमानात जाते तेव्हाच ते वितळते. स्क्विब्स ही लहान स्फोटक यंत्रे आहेत, जी विविध कार्यांसाठी वापरली जातात. हे अग्निशामक कंटेनरच्या डिस्चार्ज वाल्वमध्ये आढळतात. इस्रोच्या चांद्रयान ३ मोहिमेचा उद्देश चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणे हा आहे. जर ते यशस्वी झाले, तर अमेरिका, चीन आणि माजी यूएसएसआर नंतर ही कामगिरी करणारा भारत हा चौथा देश असेल.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.