Chandrashekhar Bawankule on Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या दौऱ्याला सरकारनं खऱ्या अर्थानं मदतच केली पाहिजे-चंद्रशेखर बावनकुळे - sharad pawar supports terrorist said Bawankule
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 20, 2023, 1:57 PM IST
रत्नागिरी Chandrashekhar Bawankule On Sharad Pawar : रत्नागिरीत बोलत असतांना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, शरद पवारांना हे कळलं पाहिजे, दहशतवादाविरुद्ध संपूर्ण जग उभं झालं आहे. मोदीजी दहशतवादाविरुद्ध उभे ठाकले आहेत. शरद पवार मोदीजींवर टीका करत आहेत. मताच्या राजकारणाकरिता, मताच्या लांगूनचालनाकरिता किती खाली जायचं आणि दहशतवादाचं किती समर्थन करायचं हे शरद पवार यांच्या बोलण्यावरून कळतंय', अशी टीका यावेळी बावनकुळे यांनी यावेळी केली. दरम्यान,मनोज जरांगे-पाटील यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले की, सर्वांचं मत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मराठा आरक्षण जे गेलं त्याला शरद पवार आणि उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. जरांगेंच्या दौऱ्याला सरकारनं खऱ्या अर्थानं मदतच केली पाहिजे. जरांगेचे आंदोलन हे सामाजिक आंदोलन असून ते राजकीय आंदोलन नाही, असंही ते यावेळी म्हणाले.