उड्डाणपुलावर वरून जाताना ट्रकचे ब्रेक झाले फेल, पहा पुढे काय घडलं - ट्रकचे ब्रेक फेल

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 26, 2023, 8:30 AM IST

चंद्रपूर Chandrapur Road Accident : उड्डाणपूल चढताना ब्रेक फेल झालेल्या ट्रकनं सुसाट मागं येत चार वाहनांना चिरडलं. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात शहरातील वरोरा नाका चौकात बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावर शनिवारी दुपारी घडला.  वरोरा नाका चौकातून ट्रक ( क्रमांक MH04 DK 6344 ) हा मूल रोडच्या दिशेनं निघाला होता. मात्र बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावरुन जाताना अचानक ट्रकचे ब्रेक फेल झाले. हा ट्रक अतिवेगात मागच्या बाजुनं यायला लागला. मागं असलेल्या चारचाकी आणि दुचाकीला धडक देत तब्बल 100 मीटर अंतर ट्रक मागच्या दिशेनं गेला. यामध्ये 3 चारचाकी आणि एका दुचाकीचं मोठं नुकसान झालं आहे.  चालकानं समयसूचकता दाखवत ट्रक मागच्या बाजूनं सरळ नेला, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. नागरिकांनी ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं.  चंद्रपूर शहरात या महिन्यात झालेल्या अपघातात तब्बल 12 जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी चिंताजनक असली, तरी स्थानिक वाहतूक पोलीस आणि यंत्रणा याबाबत अद्यापही गाफील असल्याचा आरोप नागरिकांमधून करण्यात येत आहे. शहरात झालेलं अतिक्रमण, अवैध पार्किंग यामुळं शहरातील रस्ते अरुंद झाले आहेत. त्यामुळे यावरुन चालताना अनेक अपघात होत असतात. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.