Chandrakant Khaire : खैरेंची शिरसाटांवर खतरनाक कमेंट! म्हणाले, त्यांना गोव्याचा नाद - चंद्रकांत खैरे संजय शिरसाट टीका
🎬 Watch Now: Feature Video
नांदेड : शिंदेंची शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली होती. यावरून ठाकरे गटाने शिरसाटांवर पलटवार केला आहे. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी शिरसाटांवर टीका करत सांगितले की, संजय शिरसाट हे गोव्याला जाऊन पत्यात सव्वा कोटी रुपये हारले. हे सगळे आमच्या संभाजी नगरच्या मतदारांना माहीत आहे. दरम्यान, मागच्या वेळेस मला खूप त्रास झाला. अडीच हजार फोन करून मी शिरसाटांना निवडून आणले. लोक म्हणत होते की, आम्ही त्यांना मतदान करणार नाही. तो तिथे मुंबईला पाच-पाच दिवस पडून राहतो, आम्ही त्याला निवडून देणार नाही, असे लोक मला म्हणाले होते. दरम्यान, नांदेड येथे महविकास आघडीच्या सभेची पूर्व तयारीच्या बैठकीसाठी उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.