Bhamragad Rural Hospital Pregnant Mothers : भामरागडमध्ये गरोदर मातांसाठी पोहचले सिझेरियन पथक - Delivery of pregnant mothers
🎬 Watch Now: Feature Video
गडचिरोली: भामरागड तालुका (Bhamragad Tahsil) दरवर्षीच पावसाळ्यात संपर्क तुटणारा तालुका म्हणून ओळखला जातो. अशावेळी गरोदर मातांच्या प्रसुती (Delivery of pregnant mothers) दरम्यान काही अडचणी निर्माण झाल्यास त्यांना तातडीने अहेरी किंवा गडचिरोली येथे शस्त्रक्रियेसाठी जाता येत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी गेल्या आठवड्यात याबाबत जिल्हा शल्य चिकीत्सक यांना सूचना केल्या होत्या. तेव्हा इतिहासात पहिलांदाच स्त्रीरोग तज्ञ, भूल तज्ञ, बालरोग तज्ञ व तीन प्रशिक्षित नर्स यांची चमू भामरागड येथे पुढील काही दिवस गरोदर मातांसाठी आरोग्य सेवा पुरविणार आहे. यासाठी विशेष आरोग्य पथक भामरागडला दाखल झाले आहे. यावेळी खुद्द भामरागड मधेच गरज भासल्यास अगदी सीझर सुद्धा केले जाणार आहे. त्यामुळे तालुक्यातील गरोदर मातांना दिलासा मिळाला आहे. सद्या भामरागड ग्रामीण रूग्णालयात (Bhamragad Rural Hospital) गरोदर मातांसाठी निवारागृह तयार करण्यात आले आहे. त्या ठिकाणी ५० गरोदर माता राहू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जवळच असलेल्या विविध प्राथमिक आरोग्य केंद्रातील माहेरघरात असणाऱ्या गरोदर माताही गरजेनूसार भामरागड येथे दाखल होणार आहेत. भामरागड सारख्या दुर्गम भागात उपलब्ध झालेल्या या सोईंमुळे गरोदर मातांसह त्यांचे कुटुंब देखील सुखावले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST