Burning Car Mumbai मुंबईत बर्निंग कारचा थरार.. पुलावरच घेतला पेट.. पहा व्हिडीओ

By

Published : Nov 1, 2022, 7:09 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

thumbnail

मुंबई : अवंती मिर्झा आणि तिचा ड्रायव्हर शिवबहादूर ठाण्याहून मलबार हिल येथे जात होते. मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, सायन आणि माटुंगा दरम्यान फ्लायओव्हरवर जवळ ( Car fire between Sion and Matunga flyover ) कार आली असता, अचानक त्या कारमधून धूर येऊ लागला. त्यामुळे जागीच चालक कार थांबवून मालकासह कारमधून उतरले आणि काही वेळातच कारला आग लागली. सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास ही आग लागली. या घटनेची माहिती मिळताच माटुंगा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अग्निशमन दलाला याची माहिती देताच, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आग विझेपर्यंत कार जळून खाक झाली. फ्लायओव्हरवर मध्यभागी आग लागल्याने सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती.

Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.