Dhananjay Munde Speech: सभागृहात जायला 2 मते कमी असतानाही अजितदादांनी विधान परिषदेवर संधी दिली-धनंजय मुंडे - Dhananjay Munde in Parli

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 14, 2023, 11:49 AM IST

Updated : Jul 14, 2023, 1:21 PM IST

बीड : कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर धनंजय मुंडे पहिल्यांदा बीड जिल्ह्यात आले होते. त्यांचे स्वागत बीड-अहमदनगर बॉर्डरपासून ते थेट परळीपर्यंत करण्यात आले. हा सोहळा संपूर्ण दिवसभर दिवसभर चालला. त्यानंतर धनंजय मुंडे हे परळी वैजनाथ येथे आले, वैजनाथ चरणी नतमस्तक झाले. त्यावेळेस सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, मी हा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर पहिल्यांदा परळीत आलो आहे. 2010 ला विधान सभेला पात्रता असतानाही  विधान परिषद लढवावी लागली. सभागृहात जायला 2 मते कमी असतानाही अजितदादांनी विधान परिषदेवर संधी दिली, अशा शब्दात मुंडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

जिल्ह्यामध्ये माझे स्वागत झाले आहे, एवढे प्रेम मी आतापर्यंत पाहिले नाही. मात्र, ज्या ज्या लोकांनी मला संकटाच्या काळामध्ये सहकार्य केले. त्या लोकांचे मी उपकार फेडू शकत नाही. ज्यांनी मला साथ दिली, त्या लोकांचे आभार मानतो. या मायबाप जनतेसमोर मी या ठिकाणी नतमस्तक होत आहे. माझ्या अंगाची कातडे काढून जोड शिवले तरी तुमचे उपकार फिटणार नाहीत, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी कार्यकर्ते जमलेले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

Last Updated : Jul 14, 2023, 1:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.