Bus Accident : सुसाट बसनं वाहनांना चिरडलं, एकाचा मृत्यू; पाहा थरारक व्हिडिओ - दिल्लीमध्ये बसचा अपघात
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 4, 2023, 5:36 PM IST
नवी दिल्ली Bus Accident : दिल्लीतील रोहिणीमध्ये शनिवारी एक मोठी दुर्घटना घडली. येथे दिल्ली परिवहन महामंडळाच्या अंतर्गत धावणाऱ्या एका अनियंत्रित बसनं अनेकांना धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. ही बस रोहिणी सेक्टर ३ आणि ४ दरम्यानच्या दुभाजक रस्त्यावरून जात होती. दरम्यान, अचानक बसचं नियंत्रण सुटलं आणि तिनं रस्त्यावरील कार, रिक्षा आणि दुचाकींना धडक दिली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अपघातानंतर चालकानं बसची खिडकी बंद केली. पोलीस आल्यानंतर त्यानं खिडकी उघडली. त्यावेळी ड्रायव्हर पूर्णपणे शुद्धीत नव्हता. तो मद्यधुंद अवस्थेत बस चालवत होता की बसमध्ये काही तांत्रिक बिघाड होता, याचा तपास पोलीस करत आहेत.