Bull Fight In Maharashtra: राज्यातील विविध जिल्ह्यात रेड्यांच्या झुंजी तर कुठे रेड्यांचे प्रदर्शन, शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 15, 2023, 7:53 PM IST
|Updated : Nov 15, 2023, 8:08 PM IST
मनमाड (नाशिक) Bull Fight In Maharashtra: देशभरात दिवाळी विविध पद्धतीनं साजरी करण्याची परंपरा आहे. अनेक ठिकाणी एक ना अनेक प्रकारे दिवाळी साजरी केली जाते. (Diwali celebration with bull fight) मनमाड येथे देखील शेकडो वर्षांपासून दिवाळीच्या सणात रेड्यांची झुंज खेळविली जाते. (bull fight by Gawli community) विशेष म्हणजे, गेल्या शेकडो वर्षांपासून ही परंपरा कायम असून याही वर्षी मोठ्या उत्साहात ती साजरी करण्यात आली. येथील दरगुडे स्कूल समोरील मोकळ्या मैदानावर या झुंजींचा थरार रंगला. (Manmad Bull Fight) गवळी समाजाच्या वतीनं दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी अर्थात पाडव्याच्या दिवशी सायंकाळी रेड्यांची भव्य वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. येथील लक्ष्मीआई मंदिरात रेड्यांना आणलं जातं. रेडे देवीच्या समोर नतमस्तक होतात, अशी अनोखी परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. भाऊबीजेला या रेड्यांची झुंज लावली जाते. हा सण गवळी समाज व दुध संघ यांच्या संयुक्त वतीनं साजरा करण्यात आला. महर्षी वाल्मिकी स्टेडियम येथे ही अनोखी स्पर्धा रंगली. यावेळी अनेकांनी आपले रेडे सजून धजून येथे आणले होते. स्पर्धेत जिंकणाऱ्या रेड्यांच्या मालकांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी शहरातील गवळी समाजाचे बांधव, विविध पक्षांचे नगरसेवक यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.