Elevator Accident Pune: 'देव तारी त्याला कोण मारी'....मुलगा, आई बाहेर पडताच लिफ्ट कोसळली; पहा व्हिडिओ - पुण्यातील हिंजवडी परिसरात लिफ्ट अपघात
🎬 Watch Now: Feature Video
पुणे: 'देव तारी त्याला कोण मारी', ही म्हण आपण अनेकवेळा ऐकली आहे आणि याची प्रचिती देखील वेळोवेळी विविध माध्यमातून येत असते. एखाद्या घटनेत एखाद्याचा जीव वाचला तर आपण म्हणतो ना, 'देव तारी त्याला कोण मारी'. असाच काहीसा प्रकार पुण्यातील हिंजवडी परिसरात घडला आहे. एका सोसायटीत एक मुलगा आणि त्याची आई लिफ्टमधून बाहेर पडताच ती लिफ्ट दहाव्या मजल्यावरून कोसळल्याची घटना घडली आहे. त्याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पुण्यातील हिंजवडी येथील एका सोसायटीत 10व्या मजल्यावरून लिफ्ट खाली कोसळली आहे. या लिफ्टमध्ये एक लहान मुलगा आणि त्याची आई होती. सुदैवाने या दोघांचे प्राण थोडक्यात वाचले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.