BRS leader In Pune : भाजपची खरी बी टीम राष्ट्रवादी; आता राज्याच्या जनतेने आम्हाला पाठिंबा द्यावा - बीआरएस नेते - NCP And BJP In Pune

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 4, 2023, 4:27 PM IST

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. पक्षाचे नेते अजित पवार यांनी 9 आमदारांना सोबत घेऊन भाजप आणि शिवसेनेबरोबर सत्तेत सहभागी झाले आहे. त्यानंतर ही पक्षाची भूमिका नसल्याचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. तर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. यानंतर राज्यातील राजकारणावर सर्वसामान्य नागरिकांकडून टीका केली जात आहे. राज्यातील आताच्या राजकारणावर भारतीय राष्ट्र समितीने आपली भूमिका स्पष्ट  केली आहे. राज्यातील जनतेने आमच्यावर विश्वास ठेवाव आणि येणाऱ्या काळात या राज्यातील विकास आम्हीच करू असे, बीआरएसकडून सांगण्यात येत आहे. तसेच आता राज्यातील सर्वच निवडणुका बीआरएस लढवणार आहे. हे आम्हाला भाजपची बी टीम म्हणून सांगत होते. तेच लोक आता बी टीम म्हणून सत्तेत सहभागी झाले आहे. असे देखील यावेळी बीआरएसचे नेते माणिक कदम आणि बाळासाहेब सानप यांनी सांगितले आहे. एकूणच राज्यातील राज्यातील घडामोडीवर बीआरएसचे नेते माणिक कदम आणि बाळासाहेब सानप यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.