Boycott Elections: मराठा आरक्षण मिळेपर्यंत 'या' गावानं घातलाय निवडणुकीवर बहिष्कार, पाहा गावकरी काय म्हणतात...
🎬 Watch Now: Feature Video
छत्रपती संभाजीनगर (वैजापूर ) Boycott Elections : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार कुठलीही ठोस भूमिका घेत नाहीये, अशी भावना झाल्यानं 'मराठा संघटना' आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज आता आक्रमक होताना पाहायला मिळतोय. जालना येथील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून संभाजीनगर जिल्ह्यात वेगवेगळ्या स्वरूपाचं उपोषणं सुरू (boycott elections until get Maratha reservation) आहेत. त्यातच आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातील तिडी या गावानं जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. उपविभागीय अधिकारी यांना त्याबाबत निवेदन दिलं आहे. एवढंच काय, तर जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत राजकारणी लोकांना गावात येऊ देणार नाही, असा निर्धार गावकऱ्यांनी केलाय. सरपंच रंजना आहेर या तिडी गावच्या (Tidi village in Vaijapur taluka) सरपंच आहेत. त्यांचे पती सुदाम आहेर हे देखील माजी सरपंच आहेत. ते स्वतः ओबीसी आहेत. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी पुढाकार घेताना ते पाहायला मिळत आहेत.