BKC Ground Dasara Melava : शिंदे गटासाठी बीकेसी मैदान सज्ज; दसरा मेळाव्याची तयारी पूर्ण - बीकेसी मैदान मुंबई
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा ( Dasara Melava of Eknath Shinde Group ) हा मुंबईतील बीकेसी मैदानात पार पडणार ( BKC Ground Mumbai ) आहे. यावेळी एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी मैदानात सुरू असलेल्या कामांची पाहणीसुद्धा केली होती. शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर यंदा प्रथमच शिवसेनेच्या दोन गटांचा मुंबईत दोन ठिकाणी दसरा मेळावा ( Two Factions of Shiv Sena are Holding Dasara Melava ) होत आहे. बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. बीकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने जोरदार तयारी आता पूर्णत्वाला आली आहे. ( Shinde Camp Dasara Melava ). राज्यभरातून येणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. ये-जा करणाऱ्या मार्गावर पार्किंगमुळे रस्ते वाहतुकीचा होणारा बोजवारा टाळण्यासाठी शिंदे गटाने आजूबाजूच्या खाजगी कार्यालयांचे पार्किंग भाडे तत्त्वावर आरक्षित केले आहे. ( Shinde Reserved Parking For Dasara Melava). या सर्व तयारीसाठी लाखो रुपयांचा खर्च येणे अपेक्षित आहे. बीकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST