Animals Suffer Rising Heatstroke: उष्मघात वाढला! पक्षांसह प्राण्यांनाही वाढत्या उन्हाचा त्रास; पाहा खास रिपोर्ट - animals also suffer from the rising Heatstroke
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे : गेल्या दोन आठवड्यांपासून ठाणे शहरातील तापमानाने चाळीशी पार केली आहे. या उष्णतेचा सर्वाधिक फटका हा मानवाप्रमाने प्राणी पक्षांनाहि बसत आहे. उष्माघाताने अनेक प्राणी पक्षी जखमी होत आहेत तर काहींचे बळी जात आहेत. उष्माघातामुळे अनेक प्राणी पक्षांचा मृत्यू देखील झाला आहे. झाडांची कत्तल आणि पाण्याचा अभाव या दोन कारणांमुळे या घटना घडत असल्याचे प्राणी पक्षी मित्र संघटनांनी सांगितले आहे. वाढत्या उष्णतेमुळे शरीरातील पाणी कमी झाले की मानवाप्रमाणे प्राणी पक्षांना देखील उष्माघाताचा फटका बसतो. यात जखमी होण्यामध्ये पक्षांमध्ये चिमणी, घार तर प्राण्यांमध्ये श्वान,मांजर यांची संख्या अधिक आहे. कॅप या प्राणी मित्र फाउंडेशनमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून अनेक श्वान,मांजर, पक्षी उष्मघाताने आजारी झाल्याने उपचार घेत आहेत. त्यात मांजरीच्या शरीराचे तापमान 106 ते 107 सेल्सिअस पर्यंत गेल्याने तिच्यासह अनेक पक्षांना जीव गमवावा लागला आहे.