बडगामचा तायक्वांदो खेळाडू बिलाल अहमद करणार आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व - बडगाम येथील तायक्वांदो खेळाडू
🎬 Watch Now: Feature Video
मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या बिलाल अहमदची बँकॉक येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पटवाव गावात राहणारा 22 वर्षीय बिलाल भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. बिलाल म्हणाला, 'राष्ट्रीय स्तरावर निवड होण्यासाठी मी खूप सराव केला. सुवर्णपदक जिंकले त्यानंतर माझी आंतरराष्ट्रीय स्तरावर भाग घेण्यासाठी निवड झाली. तो म्हणाला की 'माझ्या कुटुंबाने आणि मित्रांनी मला लहानपणापासून खूप साथ दिली.' बिलाल म्हणाला की, अनेक अडथळ्यांना न जुमानता तो पुढे गेला आणि मागे वळून पाहिले नाही. लक्ष्य गाठण्यासाठी त्याने बडगामच्या इनडोअर स्टेडियममध्ये जोरदार सराव केला. बिलाल अहमद म्हणाला की, 'मी तरुणांना नशेचा मार्ग सोडून खेळात सहभागी होण्याचे आवाहन करतो.' तो म्हणाले की, स्वतःला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी खेळ हा सर्वोत्तम मार्ग आहे. अंमली पदार्थांचे सेवन करणारे तरुण बिलाल अहमद यांचे आवाहन ऐकतील आणि अंमली पदार्थांचा मार्ग सोडून क्रीडा उपक्रमात झोकून देऊन मानसिक व शारीरिकदृष्ट्या निरोगी बनतील, अशी आशा आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST