Bhaskar Jadhav भास्कर जाधव यांच्या डोळ्यात अश्रू - आमदार भास्कर जाधव
🎬 Watch Now: Feature Video
Bhaskar Jadhav रत्नागिरी शिवसेना ठाकरे गट नेते, आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यानंतर भास्कर जाधव यांचं चिपळूणमध्ये आगमन झाले आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून त्यांचं भव्य स्वागत करण्यात आला आहे. यावेळी कार्यकर्त्यांचे प्रेम पाहून भास्कर जाधव यांना अश्रू अनावर झाले आहे. यावेळी आमदार भास्कर जाधव म्हणाले, की 40 वर्ष मी राजकरणात आहे. अनेक संकट पाहिली. ज्या ज्या वेळी आघात होतो. त्यावेळी माझे सहकारी अशाच प्रकारे पाठीशी उभे असतात. मला कधी ही गर्दी उभी करावी लागत नाही. एकदा का मी भूमिका घेतली की त्याच्या दुष्परिणामांची मी पर्वा करत नाही, असे भास्कर जाधव यावेळी म्हणाले. भास्कर जाधव यांची कारकीर्द सन्मानाने आणि वाघाच्या डरकाळीने संपेल, असा टोला त्यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांना लगावला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST