Bhaskar Jadhav Reaction On Sanjay Raut : 'सावधान..! शेर आ गया है' - आमदार भास्कर जाधव - Bhaskar Jadhav reaction on Sanjay Raut bail case

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 9, 2022, 6:13 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

मुंबई - मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ( Money laundering case ) शिवसेना नेते संजय राऊत ( Shiv Sena leader Sanjay Raut ) यांच्या जामीनावर आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रीया आली आहे. "सावधान रहो शेर आ गया है अशी प्रतिक्रिया आमदार भास्कर यांनी यांनी दिली ( Bhaskar Jadhav reaction on Sanjay Raut bail case ) आहे. पुढे बोलताना आमदार भास्कर जाधव म्हणाले की, " संजय राऊत यांना जेव्हा अटक झाली त्यानंतर काही दिवसांनी माझी आणि अरविंद सावंत यांची नेते पदी निवड झाली. त्यानंतर तुरुंगातून संजय राऊत यांनी आम्हाला पत्र लिहिलं होतं. त्यांनी पत्रात म्हटलं होतं शिवसेनेची साथ सोडू नका. उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका. बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या विचाराशी फारकत घेऊ नका. मी लवकरच बाहेरील असं देखील सांगितलं होतं. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नही असंही त्यांनी पत्रात लिहिलं होतं. ज्यांनी त्यांना तुरुंगात पाठवण्याचं षडयंत्र रचलं त्यांच्याविरोधात ते ताकतीने आता उभे राहतील. अन्यायाच्या विरोधात कसं लढावं याचे उत्तम उदाहरण म्हणजे संजय राऊत आहेत. ज्यांनी संजय राऊत यांना तुरुंगात टाकलं त्यांना मी सांगतो सावधान रहो शेर आ गया है."असे आमदार भास्कर जाधव म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.