Beed Violence : धनंजय मुंडे करणार बीड जिल्ह्यातील 'त्या' हिंसक घटनेची 'एसआयटी' तपासाची मागणी - बीड जिल्ह्याचे पालकमंत्री
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 5, 2023, 10:05 PM IST
बीड Minister Munde On Beed Violence: 30 ऑक्टोबरला बीड जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाच्या नावाखाली जो हिंसाचार झाला यामध्ये माजलगाव मधील प्रकाश सोळंके यांचा बंगला जाळण्यात आला. (Guardian Minister of Beed District) त्याचबरोबर नगरपालिका आणि काही तासानंतर बीड जिल्ह्यात देखील सगळ्यात पहिले राष्ट्रवादी भवन हे देखील जाळण्यात आलं. (Dhananjay Munde) त्यानंतर सिरसागर यांचं ऑफिस आणि बंगलाही दगडफेक करत जाळण्यात आला. (Violence in Beed District) बीडच्या अनेक ठिकाणी दगडफेक, जाळपोळ करण्यात आली आणि बीड शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेलं समता परिषदेचे सुभाष राऊत यांचं हॉटेल सनराईज या हॉटेलचीही मोठ्या प्रमाणात नासधूस करून जाळपोळ करण्यात आली. (Maratha Reservation Issue) या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दुःख व्यक्त केलं. हा सगळा पूर्वनियोजितच कार्यक्रम असावा. (SIT Inquiry into Beed Violence) कारण यात मारेकऱ्यांनी चक्क सगळ्या प्रतिनिधींच्या घरांना नंबर दिले होते. त्याचबरोबर या नंबरच्या माध्यमातूनच हा सगळा प्रकार या नागरिकांनी केला आहे. परंतु, पोलीस प्रशासनाने काही प्रमाणात दंगलीतील आरोपींची ओळख पटविली आहे. यावर पुढील चौकशी पोलीस प्रशासन करत खरा गुन्हेगार कोण हे शोधून काढणार आहेत. मात्र या सगळ्यांच्या पाठीमागचा सूत्रधार कोण आहे? हे पाहण्यासाठी 'एसआयटी'ची मागणी करणार असल्याचं यावेळेस मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदमध्ये सांगितलं आहे.