Monsoon Update : महाराष्ट्रात 'या' तारखेपर्यंत मान्सून होणार दाखल; शेतकऱ्याने पेरणीची घाई करू नये - शेतकऱ्याने पेरणीची घाई करू नये
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : जून महिन्याची सुरुवात झाल्यानंतर सर्वांना पावसाचे वेध लागतात. त्याचबरोबर यावर्षी शेतकऱ्यांसाठी पाऊस कसा आहे. हे देखील महत्त्वाचे असते. त्या अंदाजावरूनच शेतकरी आपली पिके घेत असतो. यावर्षी राज्यात सरासरी 95 टक्के पावसाची शक्यता असून पाच टक्के कमी अधिक होऊ शकतो. त्यासाठी शेतकऱ्याने कमी कालावधीचे खरीप पिके घेण्याचा काम करावे. पेरणीची घाई करू नये, असे हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी सांगितले आहे.
10 जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल: केरळमध्ये पाच जून पर्यंत मान्सून सक्रिय होणार आहे. त्यानंतर 10 जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर त्या त्या विभागाची पावसाची सरासरी तापमान आणि अंदाज सुद्धा रामचंद्र साबळे यांनी वर्तवलेला आहे.
असा पडणार सरासरी पाऊस: महाराष्ट्रातील पश्चिम विदर्भ विभागांमध्ये 93 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य विदर्भ विभागात शंभर टक्के पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भ विभागांमध्ये शंभर टक्के पाऊस पडणार आहे. मराठवाडा विभागात मात्र 93 टक्के पावसाची सरासरी वर्तवण्यात आली आहे. कोकण विभागात 94 टक्के, तर उत्तर महाराष्ट्रात 95 टक्के आणि पश्चिम महाराष्ट्रमध्ये 93.5 टक्के अशी पावसाची शक्यता यावर्षी वर्तवण्यात आली आहे.
पेरणीची घाई करू नये: 93 टक्के पाऊस जरी सरासरीत असला तरी, अलनिनो वादळाचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी यावर्षी थोडा पाऊस कमी असल्याने पेरणीची घाई करू नये. कारण जर शेतकऱ्यांनी लवकर पेरणी केली तर लगेच शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट येवू शकते. त्यावेळेस बियाणे उपलब्ध असतात त्यामुळे कमी कालावधीचे पेरणी शेतकऱ्याने करावे. यंदा राज्यात समाधानकारक पाऊस आहे. परंतु शंभर टक्के पडणार नाही. त्यामुळे सरासरी पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्याने काळजी घेऊन पीक पेरणी करावी. नागरिकांनी सुद्धा काळजी घ्यावी अशी प्रतिक्रिया रामचंद्र साबळे हवामान तज्ञ यांनी दिली आहे.