Jal Jeevan Mission: 'जल जीवन मिशन', 'हर घर नल जल योजने'चा गौराईपुढे साकारला आकर्षक देखावा - जल जीवन मिशन

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 24, 2023, 6:55 PM IST

Updated : Sep 24, 2023, 8:21 PM IST

गंगापूर(छत्रपती संभाजीनगर) Jal Jeevan Mission: गणरायाची स्थापना होताच घराघरात गौराईचं आगमन होतं. गौराईच्या तीन दिवसीय आगमनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसेच महालक्ष्मीपुढे विविध प्रकारचे देखावे सादर केले जातात. लासूर स्टेशन येथील क्षीरसागर कुटुंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत सुरू असलेल्या 'जलजीवन मिशन', 'हर घर नल जल योजने'चा (Har Ghar Nal Jal Yojana ) हुबेहूब आकर्षक देखावा गौराईपुढे साकारला आहे. पहिल्या दिवशी आगमन, (Kshirsagar Family) दुसऱ्या दिवशी मिष्टान्न भोजन तर तिसऱ्या दिवशी गौराईची पाठवणी असते. (Jal Jeevan Mission)
लासूर स्टेशन येथील क्षीरसागर कुटुंबीयाच्या वतीने दरवर्षी महालक्ष्मी उत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. मागील 10 वर्षांपासून महालक्ष्मी उत्सवात विविध सामाजिक संदेश देणारे देखावे तयार करून एक वेगळा आदर्श क्षीरसागर कुटुंबाने समाजासमोर ठेवला आहे. आतापर्यंत त्यांनी स्वच्छ गाव-सुंदर गाव, महाड सावित्री नदी दुर्घटना, स्वच्छ भारत अभियान, साईबाबा समाधी सोहळा, कोल्हापूरची पूर परिस्थिती, हर घर तिरंगा या विषयांवर देखील देखावे सादर केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकारच्या योजने अंतर्गत सुरू असलेल्या 'जल जीवन मिशन योजने'चा हुबेहुब देखावा साकारला आहे. या देखाव्यातून संभाजीनगर जिल्ह्यात ही योजना राबवली जाते व 'हर घर जल से नल' पाणी कसं नेण्यात आलं आहे, प्रत्येक व्यक्तीला ५५ लिटर रोजप्रमाणे तसेच शाळा अंगणवाडीकरिता नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. जनावरांसाठीही हौदाचं नियोजन केलं आहे. शुद्ध पाण्याचं नियोजन करून जलकुंभ उभारण्यात येईल "जल है तो कल है" याबद्दल माहिती देखाव्यातून देण्यात आली आहे. गेली अनेक वर्षं लासूर स्टेशन हे शहर पाण्यासाठी वणवण भटकत होतं. परंतु या योजने अंतर्गत शहराला व ग्रामीण भागातील शेतीला एक नवी संजीवनी मिळाली आहे. हे देखाव्यातून आपल्याला दिसत आहे. अत्यंत बारकाईनं हा देखावा सायली योगेश क्षीरसागर यांनी साकारला आहे. तो बघण्यासाठी अनेकांनी क्षीरसागर यांच्या घरी भेट देऊन त्यांचं कौतुक केलं.

Last Updated : Sep 24, 2023, 8:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.