APSRTC Bus Accident : ब्रेक फेल झाल्यानं बस चढली प्लॅटफॉर्मवर, तिघांचा चिरडून मृत्यू - ऑटोनगर डेपो
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 6, 2023, 12:57 PM IST
|Updated : Nov 6, 2023, 1:14 PM IST
विजयवाडा APSRTC Bus Accident : शहरातील पंडित नेहरू बसस्थानकावर आंध्र प्रदेश परिवहन बसमुळं भीषण अपघात झालाय. बस स्थानकातील फलाटावर थांबलेल्या प्रवाशांवर ही बस धडकलीय. या घटनेत तिघांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये कंडक्टरसह एक महिला आणि एका 10 महिन्यांच्या मुलाचा समावेश आहे. तर इतर काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. बस स्थानकातील 12 व्या फलाटावर हा अपघात झालाय. या अपघातात 11 आणि 12 फलाटावरील फर्निचरचं मोठ्या प्रमाणात नुकसानं झालंय. बसंचे ब्रेक फेल झाल्यानं हा अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितलंय. विजयवाडा येथील ऑटोनगर डेपोची बस गुंटूरला जात असताना हा अपघात घडलाय. गुंटूर-2 आगारातील वीराया असं या अपघातात मृत झालेल्या कंडक्टरचं नाव आहे. या अपघातामुळं बस स्थानकावर काही काळ गोंधळ उडाला होता.