Encroachment Employee Beaten : अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण; पाहा व्हिडिओ - Encroachment Employee Beaten
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : पुणे महापालिकेच्या माध्यमातून गेल्या काही दिवसापासून शहरात वेगवेगळ्या ठिकाणी अतिक्रमणाची कारवाई होत आहे. आज महापालिकेच्या वतीने ढोले पाटील रोड येथे अनधिकृत चालकांवर कारवाई करायला गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकारी तसेच सुरक्षा रक्षक यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसापासून पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने शहरात विविध ठिकाणी असलेल्या अनधिकृत ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे. कारवाई करत असताना अतिक्रमण विभागाच्या अधिकारी तसेच कर्मचारी यांना नागरिकाच्या रोषाला सामोरे जावे लागते आहे. आजही ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाचे हद्दीत कारवाई करत असताना नागरिकांकडून अतिक्रमण विभागाच्या सुरक्षारक्षकाला मारहाण करण्यात आली आहे. याबाबत अतिक्रमण उपायुक्त माधव जगताप म्हणाले की पुणे शहरात सातत्याने अतिक्रमण विरोधी कारवाई ही सातत्याने केली जात आहे. शहरातील रस्त्यावर मोठ्या संख्येनं अतिक्रमण हे होत आहे. ते काढण्यासाठी महापालिकेचे 100 निरीक्षक तसेच सुरक्षारक्षक हे मोठ्या प्रमाणावर दरोरोज जात आहे. आज देखील अतिक्रमणाची कारवाई करायला गेलेल्या कर्मचारी तसेच अधिकारी यांना मारहाण करण्यात आली. याबाबत संबंधित पोलिसांत तक्रार दखल करण्यात आली आहे.