Akshay Gavate Died : सर्वांना अभिमान वाटावा असा अक्षय आम्हा सर्वांना सोडून गेला...म्हणत मित्रांना अश्रू अनावर! - Agnivir Akshay Gavate friends Sad reactions

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 23, 2023, 2:13 PM IST

बुलढाणा Akshay Gavate Died : बुलढाण्यातील अग्निवीर अक्षय गवते यांना 20 ऑक्टोबरच्या रात्री सियाचिनमधील ग्लेशियरवर कर्तव्य बजावताना वीरमरण आलंय. आज (23 ऑक्टोबर) त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी पिंपळगाव सराई इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अक्षय यांच्या निधनानं गावावर मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली असून 'सर्वांना अभिमान वाटावा असा अक्षय आम्हा सर्वांना सोडून गेला' असं म्हणत अक्षय यांच्या मित्रांना अश्रू अनावर झाले आहे. तसंच 'अक्षय अतिशय शांत स्वभावाचा होता. तो नेहमीच सगळ्यांना प्रेरित करायचा. तो अडचणीत असणाऱ्यांना नेहमीच मदत करायचा. त्याचा संघर्ष अख्ख्या गावानं बघितलाय. शेवटी त्याला मेहनतीचं फळ मिळालं, पण ते देवाला बघवलं गेलं नाही', अशी प्रतिक्रिया अक्षयच्या एका वर्ग मित्रानं दिली. दरम्यान, महाराष्ट्राच्या अग्निविराला वीरमरण आल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.