Adivasi Ramp Walk : गडचिरोलीत पहिल्यांदाच आदिवासींचा रॅम्प वॉक, पहा व्हिडिओ... - राज्याचे अन्न व औषध मंत्री धर्मरावबाबा आत्राम
🎬 Watch Now: Feature Video
गडचिरोली : आजवर आपण अनेक फॅशन शो पाहिले असेल विविध मॉडेलला रॅम्प वॉक करताना बघितले असेल. मात्र, गडचिरोलीत आदिवासींचा रॅम्प वॉक पार पडला आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच आदिवासी युवकांच्या कोया किंग अँड क्वीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी लोककला व संस्कृती यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध राज्यातील शंभरहून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. आदिवासी संस्कृतीला नवीन पिढीने समंजसतेने स्वीकारावे यासाठी स्पर्धेत आदिवासी संस्कृतीचे सादरीकरण करण्यात आले. तर कार्यक्रमाला राज्याचे अन्न व औषध मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार देवराव होळी आणि सिने अभिनेत्री तृप्ती भोईर उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध तालुक्यातल्या स्पर्धकांनी मोठा प्रतिसाद दिला. तसेच या स्पर्धेचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.