Video धावत्या बसने घेतला पेट, प्रवाशांचे थोडक्यात वाचले प्राण - औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकात बसला आग
🎬 Watch Now: Feature Video
औरंगाबाद - शहरात बर्निंग बसचा थरार अनुभवायला मिळाला आहे. धावत्या स्मार्ट सिटी बसला आज रविवार (दि. 18 सप्टेंबर)रोजी अचानक आग लागली आहे. अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. करमाडवरून औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकात येत असताना वरूड फाट्याजवळ सिटीबसला आग लागली. बसमध्ये दहा ते बारा प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र, आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST