नदीवर पूल नसल्याने जीवघेणा प्रवास; जगदळवाडी येथील खैरी नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थ्यांचे हाल
🎬 Watch Now: Feature Video
उस्मानाबाद परंडा तालुक्यातील तांदुळवाडी नजीक असलेल्या जगदळवाडीतल्या गावकऱ्यांनी पुलाच्या मागणीसाठी अनेकवेळा निवेदन देऊन पाठपुरावा केला. मात्र प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्षच केलं आहे. जगदळवाडी ते तांदळवाडी पूल नसल्याने शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय Massive inconvenience to villagers होत आहे. शालेय विद्यार्थ्यांना पावसाळा सुरू झाला की, शाळेला जाणं शक्य होत नाही. ग्रामस्थांना व शालेय विद्यार्थ्यांना पाण्यातून वाट काढत ये जा करावी लागत आहे. जगदळवाडीकरांच्या या मागणीकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कधी लक्ष देणार ? असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारण्यात येत आहे. जगदळवाडी ते तांदूळवाडीपर्यंतचा पक्का रस्ता आणि नदीवर पूल करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. खरंतर जगळवाडीतल्या विद्यार्थ्यांना पाऊस सुरु झाला किंवा नदीला पाणी आलं की शाळा बुडवावी लागते. वास्तविक पाहता वाड्यावस्त्यावर विकास कधी पोहचणार, ईथल्या लोकांना रस्ता, दळणवळणासाठी पुल कधी मिळणार ? हाच खरा प्रश्न आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST