thumbnail

By

Published : Aug 12, 2022, 2:09 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

ETV Bharat / Videos

Har Ghar Tiranga साताऱ्यातील लोणंद शहरात निघाली तब्बल 321 फूट लांबीची तिरंगा रॅली

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत साताऱ्यातील लोणंद शहरात 321 फूट लांबीची तिरंगा रॅली काढण्यात आली. एव्हरेस्टवीर प्राजित परदेशी मित्र समुहाच्यावतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी लोणंदच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व शिक्षक तसेच एनसीसी आरएसपीचे विद्यार्थी तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत काढण्यात आलेल्या या जनजागृती फेरीमध्ये भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा देण्यात आल्या. या रॅलीसाठी एव्हरेस्टवीर प्राजित परदेशी यांनी 321 फूट लांबीचा तिरंगा उपलब्ध करून देण्यास पुढाकार घेतला. लोणंद शहरातून काढण्यात आलेल्या भव्य तिरंगा रॅलीत 500 विद्यार्थी व विद्यार्थीनी तसेच मालोजीराजे विद्यालयाचे बॅन्ड पथक सहभागी झाले होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.