ETV Bharat / state

शिर्डी साईबाबा संस्थान वीजनिर्मितीत होणार स्वयंपूर्ण; वर्षाला तब्बल 20 कोटींची होणार बचत - Shirdi Saibaba Sansthan - SHIRDI SAIBABA SANSTHAN

Shirdi Saibaba Sansthan : आता शिर्डीतील साईबाबा संस्थान वीज निर्मितीत स्वयंपूर्ण होणार असून, पर्यावरणपूरक अशा सोलर आणि पवनचक्कीच्या माध्यमातून आठ मेगावॅट एवढी वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे साईबाबा संस्थानच्या तब्बल 20 कोटी रुपयांची वर्षाला बचत होणार आहे.

Shirdi Saibaba Sansthan
शिर्डीतील साईबाबा संस्थान (etv bharat file photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2024, 12:46 PM IST

Updated : Oct 1, 2024, 2:12 PM IST

अहमदनगर Shirdi Saibaba Sansthan :- शिर्डीत साई मंदिरासह भक्तनिवास, प्रसादालय, साईबाबा हॉस्पिटल, शैक्षणिक संकुल अशा विविध इमारतींची निर्मिती करण्यात आली असून, वर्षाकाठी तब्बल 20 कोटींचा खर्च साईबाबा संस्थानाला वीज बिलासाठी येतो. आता साईबाबा संस्थान वीज निर्मितीत स्वयंपूर्ण होणार असून, पर्यावरणपूरक अशा सोलर आणि पवनचक्कीच्या माध्यमातून आठ मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे. त्यामुळे साईबाबा संस्थानच्या तब्बल 20 कोटी रुपयांची वर्षाला बचत होणार असून, विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार साईबाबा संस्थान कदाचित राज्यातील हे पहिलं तीर्थक्षेत्र ठरण्याची शक्यता आहे.

देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान : देश-विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून साईबाबांकडे पाहिलं जातं. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान अशीसुद्धा शिर्डीतल्या साई मंदिराची ख्याती आहे. साईबाबा संस्थानाअंतर्गत साई मंदिर, मंदिर परिसर, विविध भक्तनिवास, हॉस्पिटल आणि प्रसादालय अशा विविध इमारती येतात. या सर्व ठिकाणी लागणारी वीज ही महावितरणाकडूनच घेतली जाते. मात्र, काही वर्षांपूर्वी साईबाबा संस्थानामार्फत पारनेर तालुक्यातील सुपा येथे दोन पवनचक्की प्रकल्प उभारण्यात आला. तर त्यानंतर प्रसादालयाची इमारत पूर्णतः सोलरवर आधारित करण्यात आलीये. साई आश्रम भक्त निवासावरदेखील सोलर पॅनल बसवण्यात आलेय.

विजेच्या बाबतीत साईबाबा संस्थान स्वयंपूर्ण होणार (Source- ETV Bharat Reporter)

साईबाबा संस्थान पूर्णतः स्वयंपूर्ण होणार: साई संस्थानला आठ मेगावॅट विजेची गरज आहे. मात्र सद्यस्थितीत चार मेगावॅट निर्मिती ही पवनचक्की आणि रूफटॉप सोलरमधून केली जाते. तर इतर ठिकाणी लागणारी वीज ही महावितरणाकडून घेतली जाते, यासाठी वर्षाकाठी तब्बल 20 कोटींचा खर्च साईबाबा संस्थानला येतो. मात्र, काही दिवसांपूर्वीच झालेल्या महावितरण आणि साईबाबा संस्थानच्या बैठकीत साईबाबा संस्थान पूर्णतः स्वयंपूर्ण करण्यासाठी निर्णय घेण्यात आलाय. या अनुषंगाने पवनचक्कीची क्षमता वाढवणे, भक्तनिवास आणि रुग्णालयाच्या इमारतीवर सोलर युनिट बसवून वीजनिर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

साईबाबा संस्थानची 20 कोटींची बचत: येत्या आठवडाभरात नवीन दर्शन रांगेवर सोलर युनिट बसवण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. यातून साईबाबा संस्थानची तब्बल 20 कोटी रुपयांची वर्षाकाठी बचत होणार आहे. विजेच्या बाबतीत आठ मेगावॅट वीज निर्मिती करून साईबाबा संस्थान हे तीर्थक्षेत्र स्वयंपूर्ण होणार राज्यातील पहिले देवस्थान ठरेल, यात शंकाच नाही.

हेही वाचाः

  1. शिंदे गटानं गुजरातमध्ये दसरा मेळावा घ्यावा, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला - Sanjay Raut news today
  2. निवडणुकीपूर्वी अडकवण्याचा प्रयत्न, संजय राऊतांचा आरोप; तर सोमैया म्हणाले, "ठाकरेंच्या दबावामुळं..." - Sanjay Raut Defamation Case

Last Updated : Oct 1, 2024, 2:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.