ETV Bharat / bharat

सर्वोच्च न्यायालयामुळं 'त्या' विद्यार्थ्यांला मिळणार आयआयटीत प्रवेश; नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या - SC order to IIT ISM Dhanbad - SC ORDER TO IIT ISM DHANBAD

SC order to IIT ISM Dhanbad : सर्वोच्च न्यायालयानं सोमवारी (30 सप्टेंबर) आपल्या अधिकाराचा वापर करून आयआयटी धनबादला एका विद्यार्थ्याला प्रवेश देण्याचे निर्देश दिले. फी जमा करण्याची अंतिम मुदत चुकल्यानं या विद्यार्थ्याला महाविद्यालयात प्रवेश घेण्याची संधी मिळत नवह्ती.

After the Supreme Court order to IIT ISM Dhanbad, the deputy director said- Atul will be admitted
आयआयटी आयएसएमला सुप्रीम कोर्टाचे आदेश (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2024, 11:15 AM IST

धनबाद SC order to IIT ISM Dhanbad : दिलेल्या मुदतीत शुल्क न भरू शकल्यामुळं एका विद्यार्थ्याला आयआयटी धनबादमध्ये प्रवेश घेता आला नव्हता. मात्र, या प्रकरणावरुन आयआयटी प्रशासनावर नाराजी व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयानं सोमवारी (30 सप्टेंबर) एक महत्त्वाचा निकाल दिला. याप्रकरणी सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं आयआयटी धनबदाला निर्देश दिले आहेत की, सदरील विद्यार्थ्याला आयआयटीत प्रवेश द्यावा.

नेमकं काय आहे प्रकरण? : उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात राहणारा अतुल कुमार जेईई परीक्षा उत्तीर्ण झाला होता. त्याला आयआयटी धनबादमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग विभागातील जागा मिळाली होती. 24 जून 2024 पर्यंत त्याला शुल्क भरावं लागणार होतं. परंतु, तो वेळेत पैशांची जमवाजमव करून शुल्क भरू शकला नाही. त्यामुळं त्याची सीट रद्द केली गेली. त्यानंतर अतुलनं झारखंड उच्च न्यायालय आणि मद्रास उच्च न्यायालयाचं दार ठोठावलं. तिथं त्याला न्याय मिळाला नाही. अखेर अतुलनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सोमवारी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं आयआयटीवर नाराजी व्यक्त केली. तसंच अतुलला आयआयटीत प्रवेश देण्यात यावा, असे निर्देश दिले.

आयआयटी आयएसएमचे उपसंचालक धीरज कुमार (ETV Bharat)

आयआयटी आयएसएमच्या उपसंचालकांची प्रतिक्रिया : या संपूर्ण प्रकरणावर आयआयटी आयएसएमचे उपसंचालक प्रा. धीरज कुमार यांनी प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयानं आयआयटी आयएसएमला आदेश दिल्याची माहिती प्रसार माध्यमांतून कळाली. अतुल कुमारला 'जोशा'च्या अंतर्गत आयआयटी आयएसएम धनबादमध्ये सीट देण्यात आली होती. मात्र, पैसे नसल्यानं आणि फी जमा न केल्यानं अतुलला ही जागा मिळू शकली नाही. सर्वोच्च न्यायालयानं अतुलची सीट धनबाद आयआयटी आयएसएमला देत त्याला प्रवेश घेण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या प्रतीची संस्था वाट पाहत असून, आदेशाची प्रत मिळताच संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाईल."

माजी विद्यार्थीदेखील मदत करण्यासाठी उत्सुक- पुढं ते म्हणाले की, "अतुलच्या परिस्थितीची माहिती अगोदर मिळाली असती तर आयएसएमनंही त्याला मदत केली असती. याशिवाय अनेक संस्था या दिशेनं काम करत आहेत. आयएसएमचे माजी विद्यार्थीदेखील फोन करून विचारत आहेत की तसं असेल तर माहिती द्यावी. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. त्या विद्यार्थ्याला आम्ही आमच्या संस्थेत प्रवेश नक्कीच देऊ."

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.