35th Pune Festival : 35 व्या पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटन समारंभात हेमा मालिनीनं केली गणेश वंदना सादर, पाहा व्हिडिओ - Pune Festival
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 22, 2023, 10:24 PM IST
पुणे 35th Pune Festival : ज्येष्ठ अभिनेत्री तसंच विद्यमान भाजपा खासदार हेमा मालिनी यांच्या हस्ते 35 व्या पुणे फेस्टिव्हलचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी राज्याचे पर्यटनमंत्री गिरीश महाजन, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होती. हेमा मालिनी या पुणे फेस्टिव्हलच्या स्थापनेपासून सलग 35 वर्षे त्यात सक्रियपणे सहभागी होत आहेत. अभिनेत्री हेमा मालिनी यांनी 30 वर्षांहून अधिक काळ पुणे फेस्टिव्हलच्या मंचावर नृत्य, नाट्य, गणेश वंदना सादर केली आहे. यावर्षी देखील त्यांनी उद्घाटन समारंभात गणेश वंदना सादर केली. दुसऱ्या दिवशी शनिवारी हेमा मालिनी 'गंगा' बॅले नृत्य सादर करतील. पुणे फेस्टिव्हलमध्ये त्यांनी दिलेल्या अभूतपूर्व योगदानाबद्दल यंदाच्या उद्घाटन समारंभात त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.