Mahant Kashinath Maharaj Welcome : वेताळवाडीच्या भाविकांचा नादच खुळा...महंत काशिनाथ महाराजांचे केले डीजेच्या तालावर स्वागत! - महंत काशिनाथ महाराज
🎬 Watch Now: Feature Video

बीड, बीडच्या वेताळवाडी येथे 26 वा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात भाविकांनी महंत काशिनाथ महाराजांचे डीजेच्या तालावर नाचत आणि जेसीबीतून फुलांची उधळण करत जोरदार स्वागत केले. यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजी करत काशिनाथ महाराजांची सनरुफ असणाऱ्या आलिशान गाडीतून मिरवणूक काढण्यात आली. या दरम्यान भक्तांनी डीजेच्या तालावर ठेका धरला होता. तसेच जेसीबीच्या माध्यमातून फुलांची अनोखी उधळणही यावेळी करण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी महंत काशिनाथ महाराज यांचे शेकडो मीटर अंतरापर्यंत फुलांच्या पायघड्या घालून जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी वेताळवाडी येथे 26 व्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या निमित्ताने संत वामन भाऊ आणि संत भगवान बाबा यांच्या मंदिर कलशावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.