Raigad Bus Accident : नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली, अख्ख्या बसचा चक्काचूर; पाहा रिपोर्ट - रायगड बस अपघात
🎬 Watch Now: Feature Video
रायगड - पुणे मुंबई महामार्गावर अपघातांची मालिका चालूच आहे. 15 एप्रिलच्या पहाटे तीन वाजताच्या सुमारास जुन्या पुणे - मुंबई महामार्गावर एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू तर 29 प्रवासी जखमी झाले आहेत. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी ही भरधाव बस रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळ दरीत कोसळली. त्यानंतर रेस्क्यू टीम व स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी जाऊन मदतकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी पोहचून मदतकार्यांची पाहणी केली. त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूसही केली. मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांची मदत मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत अपघातावर शोक व्यक्त केला. मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान निधीतून 2 लाख रुपयांची तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत मिळणार आहे.