Karnataka's hijab controversy : हिजाब प्रकरणावरून पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच जोरदार आंदोलन - हिजाब प्रकरण अपडेट
🎬 Watch Now: Feature Video
कर्नाटकमध्ये झालेल्या हिजाब प्रकरणाचे ( Karnataka's hijab controversy ) पडसाद आता देशभर उमटताना दिसत आहेत. पुण्यात देखील राष्ट्रवादी काँगेसने ( protest against Hinab controversy in pune ) आज महात्मा फुले वाड्यात जोरदार आंदोलन केलं आहे. आम्हाला काय घालायचं किंवा आम्ही काय खायचं हे कोणी ठरवू शकत नाही. भाजपा सरकार मनमानी करत असल्याचा आरोप या आंदोलनकर्त्यानी केला आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत मुस्लिम महिला देखील सहभागी झाल्या होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपा सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून याचा आढावा घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी अभिजीत पोते यांनी.
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST