NCP Agitation Petrol Hike : "पंतप्रधानांनी जनतेला एप्रिल फूल...", राष्ट्रवादीचे इंधन दरवाढीविरोधात केक कापूस आंदोलन - पंतप्रधानांनी जनतेला एप्रिल फूल बनवले राष्ट्रवादी
🎬 Watch Now: Feature Video
गोंदिया - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला महांगाई पासून मुक्तता मिळेल, असे आश्वासन देत सत्तेवर आले. मात्र, त्यांनी जनतेला एप्रिल फूल बनवले आहे. देशात महागाई वाढली आहे. पेट्रोल-डिझेलने तर सर्व सामान्य व्यक्तीचे जीवन जगणे कठीण झाले आहे. पेट्रोलचे दर 118 रुपये 2 पैसे झाले आहे, तर डिझेलने १०० पार करीत १०० रुपये ७२ पैसे झाले आहे. त्याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल पंपावर अनोखे आंदोलन करण्यात ( NCP Agitation Against Petrol Price Hike ) आले. पंतप्रधान मोदींनी जनतेला एप्रिल फूल बनवले म्हणून केक कापत पेट्रोल भरायला येणाऱ्या नागरिकांना गुलाब देण्यात आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST