Supriya Sule on MH Budget 2022 : आपली संस्कृती आणि मराठी माणसावर प्रेम करणारे बजेट - सुप्रिया सुळे - महाराष्ट्र बजेट 2022 सादर
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज मांडलेले बजेट म्हणजे मराठी माणूस आणि मराठी संस्कृतीवर प्रेम करणारे बजेट असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी व्यक्त केले. अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्प 2022 (Maharashtra Budget 2022) सादर करण्यात आला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यादेखील विधानभवनात आल्या होत्या. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळेंनी ही भावना व्यक्त केली. अर्थसंकल्प सादर करत असताना आपल्याला राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि कुसुमाग्रजांची आठवण झाली असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. अर्थसंकल्प सादर करत असताना काही प्रमाणात काटछाट केली असली तरी शेती ते टेक्नॉलॉजीपर्यंत आणि साहित्यपर्यंत सगळ्या विभागांसाठी बजेटमध्ये दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST