VIDEO : दीड वर्षात असं काय झालं की फडणवीसांचा पोलिसांवरचा विश्वास उडाला - शंभूराज देसाई

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 14, 2022, 10:35 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

मुंबई - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गृहखाते सांभाळले आहे. मात्र, राज्याचे पोलीस (Maharashtra Police) चांगले काम करत असताना, दीड ते दोन वर्षात असे काय झाले की त्यांचा पोलिसांवरील विश्‍वास उडाला आहे, अशा शब्दात शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांनी देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला. राज्य सरकारच्या कारभाराचे देवेंद्र फडणवीस यांनी स्टिंग ऑपरेशन केले आहे. गेल्या आठवडाभरात दोन पेन ड्राईव्ह पुराव्यासहित विधिमंडळाला सादर केले आहेत. या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करावी अशी मागणी फडणवीस यांनी केली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधी पक्षनेत्यांची मागणी फेटाळून लावली. तसेच यापुढे पोलिसांच्या निलंबनाची घोषणा विधिमंडळात करणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजप सदस्यांनी सरकारच्या कारभाराचा निषेध करीत सभात्याग केला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.